मी श्री दिलीप देवकर राहणार सांगवी, पुणे, महाराष्ट्र राज्य गेली ३० वर्षे “देवकर मराठा” वधू-वर विवाह संस्था चालवत आहे. काळ बदलला विवाह पद्धतीही बदलली अपेक्षा वाढल्या पण मध्यस्थाची उणीव भासू लागली. नातेवाईकांचे प्रयत्न पुरेसे होऊ शकत नाही. लग्नाच्या गाठी स्वर्गात बांधल्या जातात. पण शोध मात्र देवकर मराठा मधेच पूर्ण होतो. आपल्या पसंतीची अचूक निवड म्हणजेच देवकर मराठा मधेच. स्थानिक वधू वर फक्त देवकर मराठा मधेच. आत्मियतेची सेवा फक्त देवकर मराठा मधेच. आपुलकीनं विवाह जुळविणारी आपली माणसं म्हणजेच ' देवकर मराठा '....
३० वर्षांची देहोप्यमान परंपरा म्हणजेच देवकर मराठा.दर वर्षी २६ जानेवारी रोजी वधू- वर व पालकांचा परिचय मेळावा मी आयोजित करतो. आजपर्यत ५५ मेळावे आयोजित केले आहेत. विवाह जमवणे हे समाजकार्य माझा छंद असून आजपर्यत आमच्या विवाह संस्थेतून दोन हजार पेक्षा जास्त विवाह जुळेल आहेत. महाराष्ट्रातील नामांकित व्यक्तीच्या मुला – मुलीचे विवाहसाठीची नोंद आमच्यकडे आहे. संस्थेत येणाऱ्या प्रत्येक पालकांच्या मुला / मुलीचे लग्न ठरायलाच पाहिजे असा ध्यास घेऊनच मी सर्वोतपरी प्रयत्न करत असतो यासाठी दर वर्षी २६ जानेवारी रोजी वधू-वर व पालकांचा परिचय मेळावा मी आयोजित करतो. आजपर्यत ५५ मेळावे आयोजित केले आहेत. या मागील उदेश्य फक्त एकच की,विवाह जमवण्यास गती यावी. गेल्या दहा वर्षा पासून दर रविवारी कार्यालयात वधू वरांचा मेळावा दुपारी १२ ते ३ आयोजित करत असतो. यामुळे प्रत्यक्ष मुले व मुली त्यांच्या पालकांना पहावयास मिळतात. तसचे एकमेकची चर्चा करून विवाह ठरण्यास मदत होते. माझ्या या दर आठवडातील मेळाव्यांनी भरपुर विवाह ठरले आहेत. परंतु आजकालच्या धावपळीच्या जीवनात व कामधंदयाच्या व्यपामुळे प्रत्येकाला संस्थे येऊन माहिती घेणे तचेस मेळाव्याला उपस्थित राहणे शक्य होत नाही.
या सर्व गोष्टीचा विचार करून मी स्वतःची वेब साईट जानेवारी २००८ पासून सुरु केली आहे व १४ फेब्रुवारी २०१२ पासून संस्थेत न येता ऑन लाईन फोटोसह फॉर्म भरण्याची सुविधा सभासदांना मिळणार आहे. माझ्या संस्थेमधील असंख्य मुला – मुलीचे फोटोसह माहिती आपणास घर बसल्या जगात कोठेही पाहवयास मिळणार आहे व त्यामुळे आपला अमूल्य वेळ वाचणार आहे.
|| याचा सर्वना निश्चितच लाभ व्हावा हीच मनापासून सदिच्छा ||